राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांचे आवाहन
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्याची छत्रपती शिवरायांची गादी,महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे . हा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी छत्रपतींचे वंशज असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने मतदारांनी निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक,अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
साताऱ्यात येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले ,इंग्रजीवर प्रभुत्व असेल तर देशाचे विधिमंडळ असणाऱ्या संसदेत आपली बाजू ठामपणे मांडता येते.उदयनराजे यांचे व्यक्तिमत्व देश पातळीवर सर्वमान्य आहे. चर्चेत सहभागी होऊन कोणत्याही विषयाला पूर्णत्वाला नेण्याची त्यांची हातोटी आहे.जेव्हा निवडणुकीला राजा उभा असतो तेव्हा सामान्यांच्या मनात एक निश्चित आदराची भावना असते,त्यामुळे ८० टक्के लोकांनी निर्णय दिलेला आहे. मागच्या वेळी पावसामुळे थोडासा चुकीचा संदेश गेल्यामुळे नुकसान झालं परंतु यावेळी मतदार राजा म्हणतोय जिल्ह्याची कमान महाराज चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यात औद्योगीकरण चांगल्या पद्धतीने होऊन येथील स्थानिक तरुणांना रोजगार निश्चित मिळेल असा ठाम दावा त्यांनी केला.
साताऱ्याची छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राचा तसेच देशाचा सन्मान आहे.तो अबाधित राखण्यासाठी उदयनराजे यांना संसदेत मतदारांनी विक्रमी मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. मोदी सरकारची ४०० पार ही घोषणा अस्तित्वात येण्यासाठी साताऱ्यातून उदयनराजे भोसले निवडून जाणे फार गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. राजेंची कॉलर त्यांना निवडून देऊन ताठ ठेवा आणि महाराजांना यावेळी एकतर्फी निवडून द्यावे असे आवाहन यशवंत भोसले यांनी यावेळी केले.
You must be logged in to post a comment.