यंदा साताऱ्यात होणार वृक्षसंमेलन

सातारा, (भूमिशिल्व वृत्तसेवा) – सह्याद्री देवराई यांच्यावतीने होणारे दुसरे वृक्षसंमेलन यंदा साताऱ्यातमध्ये आॅक्टोबरमहिन्यात होणार आहे, अशी माहिती अभिनेता सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा धीरज पाटील, सह्याद्री देवराईचे विजय निंंबाळकर उपस्थित होते.

सयाजी शिंदे म्हणाले, सातारा पोलीस दलाच्यावतीने म्हसवे येथील ३० एकर जागेत बायोडाव्हरसिटी पार्क उभा केला जात आहे. सहा महिन्यात या परिसरात चांगल्या पध्दतीने वृक्षांची वाढ होणार आहे. या ठिकाणी सातारा पोलीस आणि सह्याद्री देवराई संस्थेच्यावतीने यंदाचे संमेलन होणार आहे. मागील वर्षी हे संमेलन एप्रिल महिन्यात झाले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन यंदा आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे.

यापूर्वी राधानगरी, कोल्हापूर् येथे काटेसरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांद्वारे लोकांना झाडांचे महत्व कळेल. तसेच निसर्गप्रती लोकांची आपुलकीची भावना निर्माण होईल हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

error: Content is protected !!