वाई–पाचगणी रस्त्यावरील कालव्यात जीप कोसळली


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :  वाई- पाचगणी रस्त्यावरील कॉलेज परिसरात असणाऱ्या कालव्यात महाबळेश्वर येथील चार चाकी गाडी कोसळली.

महाबळेश्वर(नाकिंदा) येथील बलेरो गाडी (न. एम एच ११-ए के ८२१५) वाईकडे येत असताना चालक इस्माईल अब्दुल महाबळे वय ६५ वर्षे रा. नाकिंदा (महाबळेश्वर) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या पर्यटक महिलेला व उत्कर्षनगर मधील दुचाकी चालकास  धडक देवून सरळ कालव्यात जावून कोसळली,

यामध्ये चालकासह पर्यटक महिला व दुचाकी  चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना वाईतील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडीत अन्य प्रवाशी नसल्याने मोठी जीवित हानी टळली, यांची नोंद वाई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत झालेली नव्हती, पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून क्रेनच्या सहाय्याने गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली.

error: Content is protected !!