सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई-महाबळेश्वर रस्त्यावर वेण्णालेकनजीक लिंगमळा येथे शुक्रवारी टॅंकरने कारला समोरुन धडक दिली. या अपघातात जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात कार चालक किशोर वसंत गोळे (वय २५, रा.वाई) जखमी झाले आहेत.
महाड येथुन रसायन भरलेला टॅंकर हा महाबळेश्वर मार्गे हैद्राबादकडे निघाला होता. तर वाई येवुन कार ही महाबळेश्वरकडे निघाली होती. ही दोन्ही वाहने आज सकाळी साडेनउच्या दरम्यान लिंगमळा परिसरातील शिवाय हाॅटेल समोरील अवघड वळणावर आली, असता दोन्ही वाहन चालकांना समोरील वाहन दिसले नाही. सकाळी रस्ता मोकळा असल्याने दोन्ही वाहने भरधाव निघाली होती. या दोन्ही वाहनांची समोरा समोर धडक होवुन अपघात झाला टॅंकरची धडक इतकी जोरात बसल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या सात ते आठ फुट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात कार चालक किशोर वसंत गोळे हा जखमी झाला. अपघात होताच जवळच असलेल्या हाॅटेल व ढाब्यातील काही स्थानिक नागरीक धावुन आले त्यांनी कार मधील जखमी व्यक्तीस प्रथम बाहेर काढले व त्यास येथील रूग्णालयात दाखल केले.
सकाळी अपघात होताच अपघातातील टॅकर फिरला त्यामुळे संपुर्ण रस्ताच बंद झाला अनेक वाहने रस्त्याच्या बाजुन मार्ग काढीत जात होती. अशातच एक ट्क रस्त्याच्या बाजुला असलेल्या मातीतुन पुढे निघण्याचा प्रयत्न करीत होता परंतु पावसाळी वातावरणामुळे रस्त्याच्या कडेला चिखल झाला होता. या चिखलात हा ट्क अडकल्याने महाबळेश्वर पांचगणी या मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने क्रेन मागवुन रस्त्यात बंद पडलेला टॅंकर बाजुला करून वाहतुक पुर्ववत चालु केली.
You must be logged in to post a comment.