वाईतील अतिक्रमणांवर हातोडा

वाई नगरपरिषदेच्यावतीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली

वाई (भूमीशिल्प वृत्तसेवा) : वाई शहरातील रस्त्याकडेला असलेली अनधिकृत दुकाने आणि फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे नगरपालिकेच्यावतीने त्यांना अतिक्रमण काढण्याचे नोटीस दिले होते. परंतु अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने बुधवारी नगरपरिषदेच्यावतीने अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविली.

रस्त्यावर अनाधिकृत रस्त्यावरील व्यवसायिकांवर बाई नगरपरिषदेचे वतीने कार्यवाही करण्यात येवून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक अधिकृत व्यवसाय बंद झाल्याने तसेच मंडई आणि इतर ठिकाणचे अधिकृत व्यवसाय बंद केल्याने  अनेक भाजी व फळ विक्रेत्यांना नगरपरिषद क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये विभागून बसणेची परवानगी वाई नगरपालिकेच्यावतीने देण्यात आली होती.

कोरोना काळात अनेक छोटया-मोठया व्यवसायीकांनी संपूर्ण शहरात रस्त्यावर आपले व्यवसाय सुरु केले होते. शहरातील व्यवहार सुरळीत चालु झालेनंतर मार्केट,  दुकाने नियमित चालू झाल्यापासून अशा प्रकारे अनाधिकृतरित्या बसणाऱ्या सर्व व्यवसायिकांना नगरपरिषदेच्या वतीने अनेकवेळा तोंडी अथवा लेखी सुचना देवूनही न जुमानल्याने रस्त्यावरील व्यवसायिकांवर वाई नगरपरिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. शहराच्या अनेक भागात अधिकृत गाळे असणाऱ्या गाळे धारकांनीही रस्त्यावर व्यवसाय करणेस सुरवात केली होती.

आज मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अशा सर्व विक्रेत्यांवर व दुकांनासमोर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. यामध्ये रस्त्यावरील उभे केलेले दुकानाचे बोर्ड, हातगाडे, दुकानातील साहित्य, विक्रीचे साहित्य यांच्यावर कारवाई करण्यात आली, अतिक्रमण मोहीम अजूनही कडक करणार असून अतिक्रमण विभागामार्फत ही कार्यवाही सुरुच ठेवणेत येणार असलेची माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली आहे.

error: Content is protected !!