गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेवर पोलिसांची धडक कारवाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई येथील रविवार पेठेतील एका महिलेच्या
घरावर वाई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला असता तिच्याकडे
बेकायदेशीर एक किलो १३० ग्रॅम गांजा हा आमली पदार्थ व ११ हजार ३० रुपये रोख रक्कम
मिळाली आहे, पोलिसांनी सर्व माल जप्त केला आहे,त्या महिलेवर कारवाई करून तिला अटक करण्यात आली आहे, तिच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अटक केलेल्या महिलेला वाई न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तिला दोन दिवसांची
म्हणजेच शुक्रवार दिनांक २९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, अधिक तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करीत आहेत,कारवाई प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ, शीतल जानवे-खराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक- आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस कॉन्स्तेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, महिला पोलीस नाईक दीपाली निकम,

error: Content is protected !!