वाई पोलिस ठाण्याने कोरोना लढ्यात योद्धा गमावला !


पोलिस हवालदार गजानन ननावरे यांचा मृत्यू

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई पोलीस ठाण्यातील हवालदार गजानन हणमंत ननावरे (वय ५१) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मागील आठवड्यात वाई पोलीस ठाण्यातील सोळा कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. यातील अनेक कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र यातील पोलिस हवालदार गजानन ननावरे यांना मधुमेह व हृदयविकाराचा त्रास होता शिवाय उपचारा दरम्यान त्यांना पक्षाघाताचा (पॅरेलिसिस) झटका आला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
काल दुपारी त्यांना श्वासोच्छश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना श्वसन यंत्रणेचा आधारही देण्यात आला होता. दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी येताच वाई पोलिस ठाण्यासह परिसरात शोककळा पसरली. ननावरे हे मनमिळाऊ व धाडसी होते. त्यांनी सातारा मुख्यालय, मेढा, महाबळेश्वर, वाई आदी ठिकाणी सेवा बजावली होती. त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.





error: Content is protected !!