लॉकडाऊनच्या विरोधात वाई शहरात साखळी आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात असून या टोळबंदीविरोधात सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबरोबरच व्यापारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. बाजारपेठेवर निर्बंध घाला, वेळेची मर्यादा ठेवा. मात्र संपूर्ण टाळेबंदी मागे घ्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. गुरुवारी वाई शहरात व्यापारी महासंघाच्यावतीने लक्षवेधी साखळी आंदोलन झाले. तसेच प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  गेली अनेक महिने सर्व  व्यापाऱ्यांचे व्यापार बंद आहेत. आमच्या दुकानावर असेलेले सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या उपजीविकेचे मार्ग बंद झालेले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी बाजारपेठ मोडकळीस आली आहे. सध्या परिस्थिती सर्व प्रकारचे कर कामगारांचे पगार विज बिल तसेच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते देणे सुद्धा अत्यंत जिकरीचे झाले आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या कर सवलती मिळालेल्या नाहीत.
मुख्याधिकारी वाई यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार आम्ही वाईतील व्यापाऱ्यांनी पालिकेने कोरोना टेस्ट केल्या असून त्याच्या सर्व तपासण्याची नोंद नगर परिषदेकडे उपलब्ध आहे.  यामध्ये बहुतांश कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. असे निर्बंध चालू राहिले व्यापाऱ्यांना जगणे सुद्धा होईल, तरी या सर्व गोष्टींचा विचार करून रविवार दि. 11 रोजी  पर्यंत सर्व बाजारपेठा उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा सोमवार दि. 12  रोजी पासून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या नियमांना अधीन राहून आम्ही सर्व बाजारपेठ उघडणार आहोत, असा इशारा व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

error: Content is protected !!