सोळशीत शेतकऱ्यावर लांडग्याचा हल्ला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोळशी, ता. कोरेगाव येथील शेतकरी मंगळवारी रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला असता त्याच्यावर लांडग्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. महेश हिंदूराव शेलार (वय ५०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.


सोळशी येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी महेश हिंदुराव शेलार हे आपली गावालगत शेतात गेले होते. मंगळवारी रात्री अडीचच्या दरम्यान लांडग्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील शेतकरी शेलार यांच्या मदतीला आरडा ओरडा करत घटनास्थळी आला. त्यामुळे लांडग्याने तिथून पलायन केले. जखमी शेलार यांना दोन्ही हाताच्या कोपरा जवळ तसेच उजव्या पायाच्या गुडघ्याखाली जखम झाली असून शेजारील शेतकऱ्यांने त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथील दवाखान्यात रात्रीच घेऊन गेले.

डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना घरी सोडण्यात आले या घटनेची माहिती मिळताच कोरेगावचे वाठार स्टेशन येथील वन परिमंडल अधिकारी सी एच जगदाळे, व रणदुल्लाबाद येथील वनपाल अश्विनी उत्तम पवार यांनी जखमीस भेट दिली. व घटनास्थळाची पाहणी केली. तसेच सोळशी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी यापुढे रात्री-अपरात्री शेताला पाणी पाजण्यासाठी जात असाल तर स्वतःच्या संरक्षणासाठी सोबतीला माणूस व हातात बॅटरी व काठी असणे गरजेचे आहे असे आवाहन वाठार स्टेशन वन विभागाचे परिमंडल अधिकारी जगदाळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

error: Content is protected !!