सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातील कास धरण उद्भव योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील नागरिकांना कळविणेत येते की, कास माध्यमातील बंदिस्त पाईपलाईनला कासाणी व आटाळी गावाजवळ मुख्य लाईनवर दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने गळती काढणेचे काम बुधवार दि. 02 रोजी नगरपरिषदेने युध्दपातळीवर हाती घेण्यात येणार आहे.
गळतीचे काम पूर्ण होण्यास साधारण आठ तासांचा कालावधी लागणार असलेने बुधवार दि. 02 रोजी सायंकाळ सत्रातील कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी तसेच डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा या परिसरातील तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातील सायंकाळी सत्रातील होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवार दि. 03 रोजी कास माध्यमातील सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून होणारा पेठ यादोगोपाळ, मंगळवार पेठ या पेठांना तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकी या टाक्यांच्या माध्यमातून वितरण होणा-या भागातील पाणीपुरवठा अपु-या प्रमाणात अथवा न होणेची शक्यता आहे. तरी कास धरण उद्भव योजनेतून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.