सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मतदारसंघातील प्रत्येक गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यात हातखंडा असलेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यातून सातारा तालुक्यातील कारी, शहापूर- जकातवाडी, लिंब आणि सैदापूर या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे.
या गावातील नळ पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून ३६ कोटी ८५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या योजनांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी शासनस्तरावर पाठपुरावा करून या प्रस्तावांना मंजुरी मिळवली आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत.
कारी येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ५ कोटी १८ लाख, शहापूर- जकातवाडी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ७२ लाख, लिंब येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १३ कोटी २३ लाख तर, सैदापूर येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेनंतर्गत जॅकवेल, इंटेक वेल, जलशुद्धीकरण केंद्र, पाणीसाठवण टाकी, वितरण व्यवस्था आदी बाबींचा समावेश असणारी अद्यावत नळ पाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे सदर गावांचा पाणीप्रश्न सुटला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
You must be logged in to post a comment.