सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कास धरण योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी, ता. सातारा येथे गळती लागली आहे. सातारा नगरपालिकेच्यावतीने ही गळती काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाणी पुरवठा खंडीत ठेवण्यात येणार आहे.
कास योजनेचे काम बुधवारी सकाळी हाती घेण्यात येणार असल्याने बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी पाणी पुरवठा होईल. हे काम पूर्ण होण्यासाठी आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. सातारा शहरात ज्या ठिकाणी कास योजनेतून पाणी पुरवठा होतो. अशा ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा होणार नाही. या नागरिकांनी पाणी काटकसरीने वापर करावा,असे आवाहन नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे
You must be logged in to post a comment.