सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांच्या प्रेरणेतून व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मार्गदर्शनाखाली ७ वर्षाच्या मुलीसह लोणंदमधील युवकांनी वजीर सुळका सर करुन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५१ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना मानवंदना दिली.
उंच उंच टेकड्या…… घनदाट जंगल…. सभोवताली खोलगट दरी….. या मधोमध उभा असलेला हा 90 अंशातील सरळ सुळका…… कुणाच्याही अंगावर काटा येईल अशी ही जागा……हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला परिसरातील सुळका वजीर सुळका नावानं ओळखला जातो. तिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो अशा वजीर सुळक्याची चढाई करण्याची कल्पनाही करण अशक्य आहे. निसरडी वाट, सरळ उभी चढाई, त्याच्या पूर्वेकडे ६०० फूट खोल दरी, अशा या सुळक्यावर यशस्वीपणे चढाई करण्याची कामगीरी २०१८ साली नऊ वर्षाच्या मुलीने वजीर सुळका सर केला होता.
आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या तानाजी मालुसरे यांना अभिवादन करण्यासाठी एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी यांचे सह दहा जणांनी वजीर सुळका सर करन्याचा प्रयत्न केला व काही जनांनी तो वजीर सुळका सर केला. जय भवानी ! जय शिवाजी !! जय तानाजी मालुसरे !!! अशा घोषणा देत या मावळ्यांनी सर्वात अवघड असा वजीर सुळका सर केला.
ज्या पद्धतीने सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांचेसह मावळे कोंढाणा सर करायला पुढे सरसावले त्याच पद्धतीचा पेहराव करत वजीर सुळका सर करण्याची कामगिरी लोणंदकरांनी केली आहे. यावेळी सुळक्याच्या माथ्यावर जाऊन तानाजी मालुसरे यांचा जयघोष करण्यात आला. या मोहिमेत 7 वर्षाच्या ध्रुवी गणेश पडवळ या बालिकेने तर 12 वर्षाच्या युवराज जाधव या मुलाने हा अवघड असा सुळका सर करत तानाजी मालुसरे यांना अभिवादन केले. या मोहिमेत एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी यांचेसह विश्वास मिसाळ, यशोदीप काकडे, एडवेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, राजेंद्र काकडे, निमेश रावळ, सचीन भांगरे,अनिकेत धायगुडे, संकेत हाके, आकाश क्षिरसागर, राजेंद्र धायगुडे यांचे सह लहू उगाडे, कृष्णा मरगाळे, शंकर मरगाळे, रोहित अंदोडगी, तुषार दिघे, सोनाली वाघे, विलास कुमकलेे, सुरज भगत यांचा सहभाग होता.
आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे या शब्दात तानाजी मालुसरे या योध्दयाने आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलून कोंढाणा काबीज करण्याची मोहिम हाती घेतली. 4 फेब्रुवारी 1670 ला पार पडलेल्या या मोहिमेत आपल्या बलीदानाची बाजी देऊन सिंहगड काबीज केला होता. *गड आला पन सींह गेला होता* आज या घटनेला 351 वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर लोणंदकरांनी नरवीर तानाजी मालुसरे यांना मावळ्यांचा वेष परिधान करत भगवी सलामी दिली.
You must be logged in to post a comment.