आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाही : उदयनराजे भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो, नारळ वाढविणे ही एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत, असं म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात नारळ फोडणारी टोळी फिरत आहे अशी टीका केली होती. त्याला उत्तर देत असताना आज कास (ता. सातारा) येथे बामणोली रस्ता भूमिपूजन, कास धरणाची घळभरणी आणि धरणाच्या स्वयंचलित गेटच्या पूजन प्रसंगी उदयनराजे बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, ज्या लोकांनी स्वतःच्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळं केल नाही, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर उदयनराजेंनी सडकून टीका केली.

उदयनराजे म्हणाले, काही काम झालं की आम्ही केलं म्हटले जाते. वय वाढलं, पण त्यांची बुद्धी लहान मुलांपेक्षा कमी होत गेलेली आहे. नारळफोडी गँग, हो आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही काम करतोय, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. कामे केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाणे मी कमी समजतो. परंतु दिशाहीन झालेले अत्यंत सकुंचित वृत्तीची काही लोक असतात. त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे हे चुकीचं आहे.

error: Content is protected !!