कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा रहावा यासाठी निवडणुकीच्या रिंगणात : मकरंद पाटील

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे, शेतकरी हितासाठी तो पूर्ण क्षमतेनं चालला पाहिजे ही आमची भूमिका आहे. कारखान्याला विरोध कधीच केला नाही. म्हणून, कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं, तरी कारखाना उभा करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या भादे गटातील प्रचारात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे, विश्वनाथ पवार, दत्तानाना ढमाळ, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा पंचायत सदस्य मनोज पवार, दीपाली साळुंखे, काँग्रेस तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, चद्रकांत ढमाळ, शंकरराव क्षीरसागर, शिवाजीराव शेळके, हणमंतराव साळुंखे, धनाजी अहिरेकर, किसनराव ननावरे, सुरेश रासकर, विजय धायगुडे यासह परिवर्तन पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.

विश्वनाथ पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाला कारखाना व्यवस्थापन चालविण्यात सातत्याने येत असलेले अपयश येत असल्याने परिवर्तन पॅनेलला साथ दिली. संस्थापक पॅनेलच्या आडमुठ्या धोरणामुळेच कारखान्याची निवडणूक शेतकरी सभासद वर्गावर लादली गेली असल्याचा आरोप उपाध्यक्ष पवार यांनी केला. कॉंग्रेसने खंडाळा कारखाना निवडणुकीत घेतलेली भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करुन घेतलेली आहे, त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे तालुका कॉंग्रेस अध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!