विकेंड लाॅकडाऊनमुळे गर्दीने वाहणारे रस्ते सामसूम

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – महाराष्ट्र पुन्हा एकदा करोनाच्या संकटाला तोंड देत असून करोना विषाणूनं दुसऱ्या लाटेच्या रुपाने राज्यात थैमान घातले आहे. सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आठवड्याच्या शेवटी बाहेर पडणारी गर्दी रोखण्यासाठी सरकारने वीकेंड लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट असून, साताऱ्यातील रस्त्यांवरही सगळीकडे सामसून बघायला मिळाली.

राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर साताऱ्यातही करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे.  प्रचंड वेगानं होत असलेलं संक्रमण आणि वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या नव्या नियमानुसार राज्यात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तर शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाउन असणार आहे.

पहिल्या वीकेंड लॉकडाउनला शनिपासून (९ एप्रिल) सुरूवात झाली. त्यानंतर पुन्हा एकदा गर्दीने वाहणारे जिल्ह्यातील रस्ते सामसूम झालेले दिसले. सातारा जिल्हा प्रशासनाने गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या असून, पोलिसांकडून लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. शनिवारी सकाळी वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्ते सुनेसुने दिसत आहेत. विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणामही दिसून आला आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांनाकडून केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असल्यानं सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर कोणतीही बंधनं घातलेली नाहीत

error: Content is protected !!