प्रियांका मोहितेचे शिवतिर्थावर स्वागत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्याची सुकन्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

पोवई नाका शिवतीर्थ येथे सातारकर यांच्या वतीने प्रियांका मोहिते हिचे स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रियांका पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विविध क्रीडा संस्था, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ, सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी आदी सहभागी झाले होते . सातारकरांनी स्वागत कार्यक्रमास उपस्तिथ राहून प्रियांकाला शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!