सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील पश्चिम भागातील मोरे कॉलनी ते दरेखुर्द अखेरचा रस्ता यापूर्वी कधी झाल्याचे आठवत नाही. महादरे तलाव, दरेखुर्द कडे जाणारा हा रस्ता नगरपरिषदेच्या हद्दीत आल्याने डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरे परिसरातील आणि या रस्त्यावर पहाटेपासून सकाळपर्यंत आणि सायंकाळी फिरावयास येणा-या हजारो नागरीकांना याचा लाभ होईलच परंतु या भागाचा मुलभुत विकास होण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
पश्चिमभागातील नेने चौक रस्ता, मोरे कॉलनी ते दरे अखेरचा रस्ता डांबरीकरण आणि दरे येथे
पथदिव्यांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थानिक नगरसेवक वसंत( अण्णा) लेवे, नगरसेविका सौ.सुनिता पवार यांचे सह सातारा नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक प्रमुख उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, सातारा शहराचा पश्चिम भाग हा तसा मुळ भाग समजला जातो. याठिकाणी प्रामुख्याने
निवासी बस्ती मोठया प्रमाणावर आहे. येथील शांत वातावरणामुळे पश्चिम भागात निवासी सदनिका मोठया प्रमाणावर आढळतात, सातारा शहरातील पहिली अपार्टमेंट देखिल याच भागात आहे.तसेच येथुन पश्चिमेकडे यवतेश्वर डोंगर, दरे गावातील डोंगर निसर्गसंपन्नतेने नटलेले आहेत. त्यामुळे चालण्याच्या व्यायामाकरीता मोरे कॉलनी ते दरे या रस्त्याचा मोठया प्रमाणावर नागरीक वापर करतात. म्हणून याठिकाणी होत असलेला रस्ता आणि दरे येथील पथदिव्यांचा नागरीकांना निश्चितच लाभ होणार आहे. तसेच नेने चौकात येणारा रस्ता देखिल द्वांबरीकरण करण्यास सुरुवात झाल्याचे याचाही लाभ नागरीकांना होईल ठेकेदार जे कोणी आहेत, त्यांच्याकडून रस्त्यांची कामे दर्जेदार करुन घ्या अश्या सूचना प्रशासनास केल्या.
दरम्यान गेल्या सुमारे २०-२२ वर्षातुन आज मोरे कॉलनी ते दरे गावापर्यंतचा सुमारे दिड किलोमिटरचा रस्त्याचे डांबरीकरणाचा निर्णय घेवून, कामास सुरुवात करण्यात आल्यामुळे पश्चिम भागातील नागरीकांनी सातारा विकास आघाडीला विशेष धन्यवाद दिले आहेत.
You must be logged in to post a comment.