सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संसदेचे अधिवेशन असू दे किंवा विधिमंडळाचे अधिवेशन असू दे त्या ठिकाणी पत्रकारांना बंदी नाही, मात्र साताऱ्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना बंदी घातली जाते? जिल्ह्याच्या विविध योजना आणि त्यातील चुकीचे प्रकारही लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत पण हा चुकीचा प्रकार लपविण्यासाठीच प्रसार माध्यमांना लांब ठेवले जात असल्याचा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पार पडली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला बसू दिले जात नाही. सोमवारच्या बैठकीला देखील पत्रकारांना प्रवेश नव्हता. याबाबत प्रसारमाध्यमांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे चे मत जाणून घेतले. या दोन्ही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या यांच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.आमदार जयकुमार गोरे म्हणाले, प्रसार माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. जिल्हा नियोजनच्या बैठका वर्षातून अवघ्या तीन होतात. या बैठकांमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, आमदार चुकीच्या कामातील अनियमितता दाखवून देतात.
You must be logged in to post a comment.