यशवंतराव चव्हाण साहेबांना ‘भारतरत्न’ का दिला नाही?

उदयनराजेंचा पद्मविभूषण शरद पवारांना सवाल

कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे देशासाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मानसपुत्राने केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही, असा सवाल महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या ठिकाणी महायुतीचा संकल्पनामा अर्पण केला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी कराड येथे होणाऱ्या जाहीर सभेत मी करणार आहे. अशी मागणी करण्याची वेळ आत्ताच का काढली? असे ही विरोधक म्हणत आहेत.मात्र आम्ही सांगू  इच्छितो की, आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे  भांडवल करून  यापूर्वी कधीही मते मिळवली नाहीत.पण त्यांच्या प्रति आदर व्यक्त नक्कीच  करणार.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट जाहीरपणे सांगण्याची हीच वेळ योग्य आहे.

ते पुढे म्हणाले,सातारा लोकसभा मतदारसंघातील १८ लाखापेक्षा जास्त मतदारांपैकी एकही चारित्र्यवान उमेदवार मानसपुत्र म्हणून घेणाऱ्यांना मिळालेला नाही .उलट घोटाळा प्रकरणातील  आरोपिंना सहानुभूती मिळेल असे विरोधक सांगत आहेत, वास्तविक घोटाळेबाजांनी सहानुभूतीची अपेक्षा करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विरोधक रडीचा डाव खेळत तर आहेतच परंतु  कष्टकरी , शेतकरी,माथाडी बांधवांना रडवण्याचा डाव देखील खेळत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न देण्याची उदयनराजे यांनी केलेली मागणी अत्यंत रास्त आहे. चव्हाण साहेबांचे देशासाठी योगदान अमूल्य आहे. त्यांनी जपलेली संस्कृती आणि जीवनमूल्य त्याच्या बळावर त्यांना भारतरत्न देण्याची कार्यवाही होऊ शकते.

स्वतःला पद्मविभूषण घेतले…

मानसपुत्राने स्वतःला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करून घेतला; परंतु आपल्या गुरुला देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

मोदींच्या सभास्थळाची पाहणी..

कराड तालुक्यातील सैदापूर येथे २९ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभा स्थळाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले,भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे,भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले,धैर्यशील कदम, मनोज दादा घोरपडे आदींनी केली.

महायुतीचा संकल्पनामा शिवरायांच्या चरणी अर्पण

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने जाहीर केलेला महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष ॲड.दत्ता बनकर,जितेंद्र खानविलकर, जिल्हा परिषदेच माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, आरपीआयचे अण्णा वायदंडे, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, सुजाता राजेमहाडिक,स्मिता घोडके,माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे ,शंकर माळवदे,माजी उपसभापती संजय पाटील,राम हादगे,सीता हादगे,शिवानीताई कळसकर,श्रीकांत आंबेकर, चंद्रकांत पाटील,ॲड.विनीत पाटील,भाजप युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, सागर पावसे,कल्याण राक्षे, शेखरभाऊ चव्हाण, रोहित लाड आदी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावर महायुतीचा संकल्पनामा अर्पण

कराड येथील प्रीतीसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीचा वचननामा अर्पण केला.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ मनोज दादा घोरपडे,कराड दक्षिणचे प्रचार प्रमुख अतुल भोसले,विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव, विजय वाटेगावकर,उमेश शिंदे, पंकज चव्हाण, संग्राम बर्गे,सुनील काटकर,अक्षय मोहिते,काका धुमाळ, कल्याण राक्षे, सुलोचनाताई पवार, माजी नगराध्यक्ष स्मिता हुलवान, नितीन लोंढे,राहीताई मुळे, चांदणी ताई मुळे, स्वाती पिसाळ,सुधीर एकांडे, मनसेचे सागर बर्गे, ॲड.विकास पवार,दादासाहेब शिंगण, नितीन महाडिक,विनायक भोसले, काकासाहेब जाधव, ओमकार मुळे, नूरुल मुल्ला, विनोद भोसले,गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, एकनाथ बागडी, सुनील शिंदे,घनश्याम पेंढारकर, गिरीश शहा,प्रमोद शिंदे, अजितदादा गटाचे डॉ.वैभव कणसे,आशिष माने, राजेश पाटील वाठारकर, संदीप थोरवडे, राजू खराडे,गणेश भोसले, शंकर वीर,हनुमंतराव पवार, प्रशांत कुलकर्णी,रणजीत पाटील, महेश जमाले, आरपीआयचे आप्पासाहेब गायकवाड, सुहास जगताप,नितीन शहा यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय जोगेंद्र कवाडे गट,मनसे या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

error: Content is protected !!