सातारा पालिकेची निवडणूक लढविणार : लक्ष्मण माने

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा पालिकेसह जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार आहे . शिवाय राज्यात नागपूर औरंगाबाद सह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार असल्याची घोषणा ज्येष्ठ साहित्यिक  उपराकार लक्ष्मण माने यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.

माने पुढे म्हणाले , मी १९७४ साली साताऱ्यात आलो. या शहराच्या रचना जडणघडण विकास याचा मी पंचेचाळीस वर्षाचा साक्षीदार आहे. विकासाच्या प्रक्रियेत रोजगार, पर्यटन, व्यवसाय या मुद्यांवर सातारा बराच पिछाडलेला आहे.

साताऱ्यात मी मी म्हणणाऱ्या राजसत्तांनी धनदांडगे बगलबच्चे जवळ करत चाळीस वर्ष सत्ता भोगली. सातारकरांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी सातारा पालिकेचे पन्नास जागा ताकतीने लढणार आहे. सातारा जिल्ह्यात जातीय पक्ष वगळून पुरोगामी सहविचारी पक्षांसोबत जाण्यासही आमची हरकत नाही, जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ पक्षच नव्हे तर मतदारांनाही आम्ही आमची दखल घ्यायला भाग पाडू असा ठाम विश्वास लक्ष्मण माने यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!