सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांचा मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला. सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. छाया संतोष बोधे (वय ३८ वर्षे) असे मृत कामगारांचे नाव आहे.
त्या मागील सहा वर्षांपासून गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपनीत मागील दहा वर्षांपासून काम करीत आहेत. आज पहिल्या पाळीत सकाळी सात वाजता त्या कामावर गेल्या. यावेळी रोप-वेचे काम करण्यासाठी मशीन सुरु करत असताना त्याचा पाय नेटमध्ये अडकल्याने त्यांचे संपूर्ण शरीर वेगाने दोरीसोबत गुंडाळले गेले. यावेळी कामावर असलेल्या अन्य कामगारांनी त्वरित मशीन बंद केले. दरम्यान त्या बेशुद्ध पडल्या होत्या.त्यांना तातडीने वाईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यांचे पती संतोष तान्याबा बोधे हे देखील कंपनीत काम करीत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या घटनेची नोंद वाई पोलिसात झाली आहे.
You must be logged in to post a comment.