सातारा पालिकेवर महिलाराज

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेच्या सभापती पदाची निवडीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी महिलांना प्राधान्य देण्यात आल्या. पालिकेच्या विशेष सभेत झालेल्या निवडीनंतर पालिकेवर महिलाराज आले आहे.

सातारा नगरपरिषदेवर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी स्थायी समितीच्या पदसिध्द सभापती नगराध्यक्ष माधवी कदम आहे. तर सदस्य म्हणून मनोज शेंडे, दत्तात्रय बनकर, निशांत पाटील, अशोक मोने यांचा समावेश करण्यात आला आहे. इतर विशेष समितीमध्ये बांधकाम सभापती पदी सिध्दी पवार, शहर नियोजन समितीवर स्नेहा नलवडे, पाणी पुरवठा समितीवर सिता हदगे, महिला व बालकल्याण सभापतीपदी रजनी जेधे, उपसभापती संगिता आवळे, आरोग्य सभापती पदी अनिता घोरपडे यांना मुदत वाढ दिली आहे. तर शिक्षण सभापती पदी मनोज शेंडे यांची निवड करण्यात आली आहे.

आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर या निवडी केल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!