सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महिला पोलिसाने शुल्लक कारणावरून अल्पवयीन चार ते सहा वर्षांच्या लहान मुलांसह त्यांच्या आईलाही काठीने मारहाण करून त्यांची वरात काढण्याची किळसवाणी घटना फलटण शहरात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहरातील दत्तनगर येथील एका घरात लहान मुले व त्याची आई सकाळी झोपेत असतानाच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाने त्यांच्या घरात जाऊन ‘आमच्या घरची झाडे चोरताय काय?’ असे म्हणत अल्पवयीन मुलांबरोबर आईलाही काठीचे व्रण उठेपर्यंत चोप दिला. लहान मुलांनी खेळायला आणलेली फुलांची झाडे व कुंड्या डोक्यावर घेऊन पीडित महिला व मुलांची महिला पोलिसाने स्वतःच्या घराकडे शिव्या देत वरात काढली.
You must be logged in to post a comment.