वेचले विकास सेवा सोसायटीचे कार्य आदर्शवत : आ.शिवेंद्रसिंहराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): विकास सेवा सोसायट्या या ग्रामीण भागातील अर्थकारणाच्या कणा आहेत. अनेक विकास सेवा सोसायट्यांची सभासद शेतकऱ्यांची उन्नती साधली आहे. वेचले विकास सेवा सोसायटीने सभासदांना १० टक्के लाभाऊंश देऊन आपल्या कार्याची पोचपावती दिली आहे. वेचले सोसायटीचे कार्य आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

सातारा तालुक्यातील वेचले विकास सोसायटीने सभासदांना १० टक्के लाभाऊंशदिला असून त्याचे वाटप आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रमोद जाधव, व्हा. चेअरमन राहुल खामकर, सर्व संचालक, विजय चव्हाण, सुधाकर चव्हाण, सचिव लहुराज चव्हाण यांच्यासह जिल्हा बँकेचे कर्मचारी, वेचले ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ४० वर्षानंतर पहिल्यांदाच वेचले सोसायटीने सभासदांना लाभाऊंश वाटप करून आपल्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला आहे. सोसायट्यांच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक साहाय्य केले जाते मात्र लाभाऊंश वाटप केले जात असल्याने सभासदांना दिवाळीची भेट मिळत आहे. ही बाबा आनंददायी असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. वेचले सोसायटी आणि सभासदांच्या उन्नतीसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

error: Content is protected !!