या कोरोनाचं करायचं तरी काय..?

दिवसभरातील 36 जणांसह जिल्ह्यात 973 पॉझिटिव्ह

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी 47 तर  रविवारी 36 अशा एकूण 83 जणांना अवघ्या दोन दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये जावली तालुक्यातील 11 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 973 झाली आहे. दरम्यान,  दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे

कराड : खुबी येथील 19 वर्षीय युवक, रेठरे खुर्द येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला, पाटण : सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, माण : खांडेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, खटाव : येळीव येथील 76 वर्षीय महिला आणि अनुक्रमे 24 व 26 वर्षीय पुरुष, कोरेगाव : बनवडी 39 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष, जावली : रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षांचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा : गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष, जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर-कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीय युवक, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, खंडाळा : शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ (शहाजी चौक) येथील 20 व 42 वर्षीय पुरुष, वाई : सह्याद्रीनगर येथील 30 वर्षीय पुरुष असे एकूण 36 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केली गेलेली नाही.
आणखी 2 जण कोरोनामुक्त
डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये फलटण तालुक्यातील बरड येथील 26 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज देण्यात आलेल्या एका रुग्णाच्या कोरोना चाचणीचा नमुना दुबार पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची संख्या एकूण 973 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 713 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत उपचार घेणार्‍यांची संख्या 218 इतकी असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 42 इतकी झाली आहे.
191 जणांचे नमुने निगेटिव्ह
एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांनी 191 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
103 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 31, कोरोना केअर सेंटर (शिरवळ) येथील 15, रायगाव येथील 16, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील 11 महाबळेश्वर येथे 14 अशा एकूण 103 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.
error: Content is protected !!