सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा – कास मार्गावरील यवतेश्वर घाटात दोन ते तीन ठिकाणी आजच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
कास-सातारा रस्त्यावर सध्या पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. कास तलाव, एकीब धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. बुधवारी रात्रभर झालेल्या अति मुसळधार पावसाने यवतेश्वर घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. ही दरड रस्त्यालगत कोसळली असल्याने वाहतुकीस कोणताही अडसर निर्माण झाला नाही. परंतु काही ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या चरी बुजुन रस्त्यावर पाणी, माती, बारीक दगडं काही प्रमाणात आल्याने जेसीबीच्या साह्याने चरी मोकळया करण्याचे काम सुरू होते.
तापोळा , बामणोलीच्या ओढ्या काठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भातशेतीत पाणी शिरुन भात खाचरांचे आतोनात नुकसान झाले. बामणोली ओढ्या काठी असणाऱ्या तुकाराम डिगे यांच्या भात खाचरात ओढयाचे पाणी शिरून भात खाचरांचे बांध, ताली तुटल्या अशाच प्रकारचे नुकसान तापोळा , बामणोलीच्या कित्येक शेतकऱ्यांचे झाले आहे.
You must be logged in to post a comment.