सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथिल एका युवकाने कोरोना आजाराच्या नैराश्यातून अलगीकरण करण्यात आलेल्या घरातच लोखंडी अँगलला साडीच्या साहय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हि घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. अमोल चंद्रकांत कणसे (वय २९) असे युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अमोल कणसे या युवकाला गेली पाच ते सहा दिवसापासून कोरोनाची लागण झालेली होती. कोरोनाची काही प्रमाणात लक्षणे असल्यामुळे त्याला शेजारीच असणाऱ्या घरात अलगीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचेवर कोरोनाचे उपचार सुरू होते. तसेच त्याला घरातील लोकाच्या कडून त्याला नियमित जेवन औषधेपचार दिला जात होता. घरातील लोकांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री त्याला जेवन औषधे दिली होती. बुधवारी सकाळी त्याला नाष्टा देण्यासाठी चुलत भाऊ वैभव कणसे,अमर कणसे,सुरज कणसे हे गेले असता. आतून दरवाजा बंद असल्याने हाका मरल्या मात्र आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने खोलीचा दरवाज तोडला. संबंधीत युवकाने पत्र्याला असणाऱ्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबरी जबाब देण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे राजू मुलाणी व मिथून मोरे हे करीत आहेत।
You must be logged in to post a comment.