सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा शहरातील शाहुपुरी येथील एका महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गावी गेलेल्या आईला व्हिडिओ कॉल करून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती शाहुपुरी पोलिसांना देण्यात आली.
याबाबत शाहूपुरी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी येथील जिजामाता कॉलनीतील प्रेम लहू पवार (वय -16) हा आपल्या आई- वडिलांसह राहतो. प्रेम याचे मूळ गाव आसनगाव असून आई-वडील काल तिकडे शेतीकामासाठी गेले होते. आज आईचा वाढदिवस असल्याने प्रेमे सकाळी आईला फोन करून वाढदिवसाच्याbशुभेच्छा दिल्या. यानंतर त्यानं काही वेळाने गळफास घेतला असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या काही जणांच्या लक्षात आली.
You must be logged in to post a comment.