सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तरूणीला खोलीमध्ये नेऊन तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. २० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
मुक्तार नासीर शेख (वय २४, रा. राजसपुरा पेठ, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुक्तार शेख याने २३ वर्षीय पीडित तरूणीला एका रुममध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिला भूरळ पाडली. त्यानंतर तिला बेडवर ढकलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
या प्रकारानंतर संबंधित पीडित मुलीने हा प्रकार घरातल्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री नऊ वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीने मुक्तार शेखच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मुक्तार शेखवर बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल केला. काही वेळातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करीत आहेत.
You must be logged in to post a comment.