सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज सातारा येथे सातारा जिल्हा युवक कॉंग्रेस तर्फे महागाई विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
महागाई कमी करण्यासाठी १ कोटी स्वाक्षरी घेऊन महाराष्ट्र युवक काँगेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील हे राष्ट्रपतींना स्वाक्षऱ्या पाठवून निवेदन करणार आहेत. याप्रसंगी यावेळी प्रदेश सचिव ऋषिकेश ताटे, अमित जाधव जिल्हा सोशल मीडिया समन्वयक , सरचिटणीस शाहिद इनामदार, प्रमोद अनपट, रिजवान शेख, अभिजीत कारंडे , गणेश शिंदे, किसन धायगुडे, अमोल शिंदे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक प्रदेश सचिव गायत्री जय सेन व मंदार वाडेकर उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विराज शिंदे म्हणाले की सर्वसामान्यांची दिशाभूल करून लोकांना खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. दहा कोटी नोकऱ्या , शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे वचन आणि दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलची वाढणारी महागाई त्याविरोधात युवक काँग्रेस सर्वसामान्यांचे आवाज म्हणून रस्त्यावर तीव्र आंदोलन करणार आहे आणि ह्या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज निर्दयी मोदी सरकार पर्यंत पोहोचणार आहे.
You must be logged in to post a comment.