सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दोन दुचाकी व एक कार यांचा तिहेरी अपघात होऊन एका अभियंता तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीत दि. २० रोजी सायंकाळी सहा वाजता झाला. केतन यशवंत लेंभे (वय २२, रा.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केतन लेंभे आणि जय उत्तम भोईटे (वय २२, रा. आदर्की बुद्रुक ता. फलटण) हे दोघेही शनिवारी सकाळी आपल्या व्यक्तीगत कामानिमित्त सातारा येथे आले होते. त्यानंतर ते पिंपोडे बुद्रुक येथील गावी दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, आरळे येथे ते आले असता कारने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने समोरच्या दुचाकीला त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी केतन लेंभे याचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर जय भोईटेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
You must be logged in to post a comment.