सातारा ( भूमिशिल्प वृत्तसेवा) : लाॅकडाऊनच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे विजयनगर, ता. माण येथील शिक्षक बालाजी जाधव हे आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी लाॅकडाऊन काळात काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे.
बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी आहेत. लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. आई-वडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी दूरसंवादाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला. मोठय़ा मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला. जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली.
शिक्षण क्षेत्रातील या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह अॅवॉर्डस पुरस्कारा जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी एकूण ८७ देशांतून २५०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यात नऊ देशांतील ११ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
You must be logged in to post a comment.