सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये अश्या सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामग्रहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर,पोलीस उपाधीक्षक डॉ शीतल जानवे,तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, राजेश कुंभारदरे, डी एम बावळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सहा वनसंरक्षक सचिन डोंबाळे, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पांचगणीचे गिरीश दापकेकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, महावितरणच्या दीपाली बर्गे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी सहदेव भिसे लहू राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.