महाबळेश्वरमधील ७५ गावांचा संपर्क तुटला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वरमध्ये प्रथमच २४ तासात ५९४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. या पावसामुळे घावरी या गावातील दरड कोसळून अकुंश मारूती सपकाळ या तरणाची मृत्यु झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यांतील २८ पेक्षा अधिक गावांमध्ये दरड झाडे खांब पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ७५ पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटलेला आहे.

दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यांतील प्रत्येक गांवात नदी नाल्याच्या पाण्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे महाबळेश्वर लिंगमळा रस्ता, हाॅटेल भारत येथील तापोळा रस्ता, महाबळेश्वर पाचगणी प्रतापसिंह गार्डन समोरील रस्ता खचून गेला आहे. तर महाबळेश्वर पोलादपूर रस्ता हा कावळ्याचीमोरी याठिकाणी खचला आहे. हाच रस्ता पुढे अनेक ठिकाणी खचला असल्याची माहिती बांधकाम विभागातून मिळत आहे. वेण्णालेक नदी पात्राचे पाणी बऱ्याच हॅाटेल मध्ये गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात धाबे वाल्यांचे नुकसान झालेले आहे.

महाबळेश्वर तहसिलदार सुषमा पाटील यांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर मधील दुधोशी गावात आठ घरावर दरड पडलेली असून जीवित हानी झालेली नाही. मंदिर संपूर्णपणे दरडी खाली गेले आहे. जनावराच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे तर एरंडल, झांझवड, चतुरबेट ,दुधगाव, गोरोशी, चिखली, मालूसर अशा अनेक गावांमध्येच दरडी पडलेल्या आहे. काही गावात नुकसान व दरडी पडल्याची माहिती अजूनही मिळाली नाही.

error: Content is protected !!