प्रेम प्रकरणाच्या संशयातून आई- वडिलांनीच घेतला मुलीच्या नरडीचा घोट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड तालुक्यातील एका गावात प्रेमप्रकरणाच्या संशयातून आई- वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा खून करून तीचा मृतदेह डोंगरावर पुरल्याची धक्कादायक घटना घडली.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील गावात वडिलांनी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद 17 एप्रिल रोजी कराड तालुका पोलिसात दाखल होती. मुलगीबाबत वडीलांवर शंका व्यक्त झाली. काल रात्री वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो मृतदेह त्यांनी पवारवाडी येथील डोंगरात पुरला. पोलिसांनी आज (1 मे) सकाळी पोलिसांनी मुलीचा पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी उशिरा पोलिसांनी संशयितआई- वडिलांना अटक केली आहे.

error: Content is protected !!