जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पार; प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या सोडतीनुसार विविध प्रवर्गांनुसार सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खटाव पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. फलटण, कोरेगाव व महाबळेश्वर या पंचायत समित्यांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत आरक्षण ठरविण्यात आले असून, फलटण व कोरेगावमध्ये महिला प्रवर्ग, तर महाबळेश्वरमध्ये खुला प्रवर्ग ठरला आहे.खंडाळा, पाटण आणि कराड या तीनही पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी, तर जावली, वाई, माण आणि सातारा पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

या सोडतीनंतर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील नव्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही दिवसांत निवड प्रक्रियेची हालचाल वेग घेणार आहे.

error: Content is protected !!