श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे निधन

श्री.छ.वेदांतिकाराजे यांना पितृशोक; फरांदवाडी येथे होणार अंत्यसंस्कार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): फलटण येथील ख्यातनाम उद्योजक, समाजसेवक श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा बंटीराजे खर्डेकर (वय ७९) मूळ रा. कोल्हापूर यांचे शनिवार दि. १२ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे ते बंधू, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा तथा सासरे तर, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे ते वडील होत.

कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर घराण्याचे वंशज असलेल्या बंटीराजे खर्डेकर यांनी औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी साईराजा फ्रुट अँड फूड प्रोसेसिंग कंपनीची स्थापना करून या कंपनीचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवला. त्यांना शेतीची विशेष आवड होती. त्यांनी फलटण येथील श्रीराम साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पदही भूषविले. नेहमी हसतमुख असणारे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून बंटीराजे खर्डेकर यांना ओळखले जाते. त्यांच्या पश्चात पत्नी वैशालिनिराजे, मुलगा दिप्तीमानराजे, मुलगी वेदांतिकाराजे भोसले, जावई शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुन, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर रविवार दि. १३ रोजी सकाळी १० वाजता साईराजा फॅक्टरी, फरांदवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत तर, सावडणे विधी सोमवारी सकाळी ९ वाजता साईराजा फॅक्टरी, फरांदवाडी येथे होणार आहेत.

error: Content is protected !!