महिला सक्षमीकरणासाठी परिश्रमाला पर्याय नाही : सौ.वैशाली शिंदे

स्वराज्य प्रतिष्ठान व दिव्यम शिवभारत कंपनीच्या महिला स्वयंरोजगार केंद्राचे उद्घाटन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : गावोगावच्या महिला सक्षम होण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने स्वराज्य प्रतिष्ठान व दिव्यम शिवभारत कंपनीने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.महिला सक्षमीकरणासाठी परिश्रमाला पर्याय नाही,असे प्रतिपादन सार्थक महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष सौ. वैशाली शशिकांत शिंदे यांनी केले.

आसगाव (ता. सातारा) या पुनर्वसीत गावात आयोजित महिला स्वयंरोजगार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी युवा नेते साहिलबाबा शिंदे, स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यम शिवभारत कंपनीचे मुख्य प्रवर्तक रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (दादा), सरपंच सौ. सुनंदा शिंदे यांच्यासह आसगाव येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किसनराव शिंदे, उपसरपंच बाजीराव शिंदे, माजी अध्यक्ष अजित शिंदे, मुंबईकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, ज्येष्ठ नेते डी. आर. तात्या शिंदे, आप्पा सपकाळ, ग्रामपंचायत अधिकारी सौ. भगत मॅडम, ग्रामपंचायत सदस्य हर्षल शिंदे, हिरालाल शिंदे, सौ. रेश्मा शिंदे, सौ आशा शिंदे, रामदास शिंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात आणि मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणावर विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या माध्यमातून शाश्वत प्रगती करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. माता- भगिनींच्या हाताला काम व घामाला दाम देण्यासाठी रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (दादा) यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वयंरोजगार केंद्राच्या उद्घाटनातून स्त्री सक्षमीकरणाचा नवा पाया रचल्याचे समाधान वाटते, असेही सौ. शिंदे म्हणाल्या.

यावेळी रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (दादा) यांनी मातीच्या व सुगंधी पणती व दिव्यांची निर्मिती तसेच त्यांच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाची माहिती देऊन प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित महिलांना रोजगाराची नवी दिशा दाखवली.

प्रारंभी गावातील स्वागत कमानीपासून केंद्रापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तेथे सौ वैशालीताई शिंदे (वहिनीसाहेब) यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात सभा झाली. त्यावेळी प्रारंभी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे सत्कार केले. उपस्थित महिलांनी या उपक्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली, तसेच स्वयंरोजगार व स्त्री सक्षमीकरणाद्वारे खऱ्या अर्थाने घरोघरी प्रकाश पोहोचेल व महिला आर्थिकदृष्ट्या स्थिर होतील, असा आशावादही व्यक्त केला.

यावेळी अतुल शिंदे, सोनू शिंदे, अक्षय शिंदे, हिरालाल शिंदे, बंटी कांबळे, शक्ती शिंदे, गणेश शिंदे, शिवाजी शिंदे, अनिल पोळ, शंकर शिंदे, सचिन पिसाळ, योगेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, सोमनाथ शिंदे, प्रतीक चौधरी, सचिन पिसाळ पंचक्रोशीतील महिला युवक कार्यकर्ते व आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल महिलांसह विविध नागरिकांनी समाधान व्यक्त केले व सौ वैशालीताई शिंदे तसेच रकुलकार्तिकेय पार्वती महादेव (दादा) व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!