सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सातारा शहर, शाहूपुरी, वाई आणि कराड शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या,घरफोड्यांचे गुन्हे दाखल असलेल्या चार टोळ्यांमधील १८ जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. यामध्ये सातारा, वाई आणि कऱ्हाडमधील संशयितांचा समावेश आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी,दरोडा यासारखे गंभीर गुन्हे आमिर इम्तियाज मुजावर (वय २२,रा. पिरवाडी,सातारा),अमीर सलीम शेख (वय, १९, रा. वनवासवाडी,सातारा), अभिजीत राजू भिसे (वय १८,रा. आदर्शनगरी,सैदापूर), जगदीश रामेश्वर मते (वय २०, रा.रांगोळे कॉलनी,शाहूपुरी), आकाश हणमंत पवार (वय २०), सौरभ उर्फ गोट्या संजय जाधव (वय २०, दोघे रा.सैदापूर,सातारा) या टोळीवर होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्यात आले. त्याचबरोबर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या, चोरी,मारामाऱ्या करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी (वय २३), अर्जुन नागराज गोसावी (वय ३५), रवी निलकंठ घाडगे (वय २५, सर्व रा.यशवंतनगर,सैदापूर), विपूल तानाजी नलवडे (वय २०, रा. वायदंडे कॉलनी,सैदापूर), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय २०,रा. सैदापूर,सातारा) या टोळीलाही दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी,सरकारी कामात अडथळा आणणे, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या रॉकी निवास घाडगे (वय२९), कृष्णा निवास घाडगे (वय २३), सनी निवास घाडगे (वय ३०,सर्व रा. लाखानगर,सोनगिरवाडी,वाई) या टोळीला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गुन्हे दाखल असलेल्या आशिष अशोक पाडळकर (वय ३२), इंद्रजित हणमंत पवार (वय २४), अनिकेत रमेश शेलार (वय २१, सर्व रा.मलकापूर, कऱ्हाड), सुदर्शन हणमंत चोरगे (वय २०, रा.कोयना वसाहत, कऱ्हाड) यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.