कराड, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पोलीस विभागाच्या कराड शहर वाहतूक शाखेकडून शनिवारी विद्यानगर कॉलेज परिसरामध्ये वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येऊन ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दरम्यान, कराड वाहतूक शाखेने राबविलेल्या मोहिमेचे कौतुक करून करण्यात आलेल्या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या आदेशानुसार कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर वाहतूक शाखेच्यावतीने विद्यानगर परिसरामध्ये वाहतूक केसेस मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान प्रामुख्याने ट्रिपल सीट,लायसन्स जवळ न बाळगणे,फॅन्सी नंबर प्लेट, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे,सीट बेल्ट न लावणे अशा विविध प्रकारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी पाच फॅन्सी नंबर प्लेटही जप्त करण्यात आल्या.
या मोहीमेमध्ये कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक चेतन मछले , पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव, सहाय्यक फौजदार राजेश घाडगे, पोहवा संतोष पाटणकर, प्रशांत शेवाळे, मनोज शिंदे, पो. ना. शरद चव्हाण, विक्रम हसबे, महिला पोलीस नाईक अश्विनी सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल जयसिंग काटे, सागर चव्हाण, प्रशांत मोहिते, प्रकाश झिंगुर, शशिकांत घाडगे, वर्षा भोसले, पूजा पाटील, चालक विष्णू मर्ढेकर आदींनी सहभाग घेतला होता.
यापुढेही कडक कारवाई करणार : सपोनि चेतन मछले
आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवामध्येही कराड शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारच्या अचानक मोहीम राबवून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणार आहे.
You must be logged in to post a comment.