तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे प्रतिपादन
सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यातील वंचित, भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांनी गुरुवारी कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे उमेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सातारा जिल्ह्यातील २५७, कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून उमेश चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार करून कोरेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे गुरुवारी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी उमेश चव्हाण यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
उमेश चव्हाण यांनी दलित महासंघ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली व लोकांची प्रश्न सोडवले आहेत. पारधी हक्क अभियान राबविण्यासह विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली असून कामाच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
यावेळी किरण माने, सौ. मनीषा चव्हाण, सौ. विमल शिंदे, महेश वायदंडे, विनोद कवठेकर, प्रताप गायकवाड, मंगेश चव्हाण, रीना भोसले, चमेली पवार, माधुरी भोसले, दीपक पासने, निलेश लोंढे, प्रशांत कोळी, अमोल वायदंडे, संदीप भोसले, शंकर भोसले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.