वाई (भूमिशिल्प वृत्तसेवा) – वाई तालुक्यातील लोहारे हे गाव, पालपेश्वर लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे सर्वांना माहितीचं आहे. परंतु या गावाच्या माळरानावर एक अपरिचित साधारण १७ शतकाच्या उत्तर व १८ शतकंच्या पुर्वाधातील पुरातन बारव सापडला आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले लोहारेच्या दिशेने वळू लागली आहेत
लोहारे येथील पुरातन बारव (विहीर) एकाच बाजूने, उतरण्यासाठी मार्ग असलेल्या विहिरीला, नंदा बारव असे म्हणतात. ही बारव (विहीर) नंदा प्रकारातील असून हिला चावीच्या आकाराची सुद्धा बारव (विहीर) असे म्हटले जाते. ही बारव (विहीर) पूर्वाभिमुख असून पूर्वेकडून ३ फुटाच्या अरुंद जिन्यातून विहिरीत उतरण्यासाठी ४० पायऱ्यांचा मार्ग आहे. विहिरीचा गोलाकार व्यास १२ फुटाचा असून बारवेची एकूण लांबी ३५ फुट आहे. संपूर्ण बारवेचे बांधकाम चुना आणि दगडी चिऱ्यांमध्ये झालेले असून विहिरीच्या वरील संरक्षक भिंती या पक्क्या विटांच्या बांधकामातील आहेत. या बारवेमध्ये पाणी उपलब्ध असून विहिरीत कुठेही शिल्प अथवा शिलालेख कोरलेला आढळतात नाही.
भारतात अशा प्रकारातील एकूण २३ हजार बारव आहेत. या बारवेच्या बांधकामावरून असे वाटते, की पेशव्यांच्या उत्तर काळात वाईच्या रास्ते सरदारांनी ही बारव (विहीर) बांधली असावी. माळरानावरचं बारव बांधण्याचं प्रयोजन का असावं? असा प्रश्न पडतो. पण या विहिरीवर कुठेही मोट लावण्यासाठीचे अवशेष दिसत नाहीत. म्हणजे पूर्वीच्या काळी या विहिरीचा उपयोग फक्त पिण्याच्या पाण्यासाठी करत असावेत. पूर्वीच्या काळी वाई भागातून भोर आणि खंडाळा भागांत जाण्यासाठी येथून पर्यायी मार्ग असावा. तसेच या मार्गाने दळणवळण आणि तत्कालीन सैन्य त्यांचे घोडे सुद्धा प्रवास करीत असावेत. आत्ता सुद्धा लोहारे मधून डोंगर वाटेने मांढरदेव पठारावर जाता येते. तसेच सासवड आणि भोर भागातील काही पालख्या कृष्णेच्या भेटीला अजूनही या मार्गे येतात. थोडक्यात, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या मार्गातील राबता बघता.. वाटसरूंसाठी, सैन्यांसाठी, घोड्यांसाठी या बारवेची (विहीरीची) निर्मिती केलेली असावी.
ही बारव भटकंती सह्याद्रीची गृपच्या रोहित मुंगसे,अनिकेत वाडकर, सौरभ जाधव यांनी शोधली असून या गृपच्या वतीने गेली सहा वर्षांपासून गडकिल्ल्याचे संवर्धना काम चालू असून आतापर्यंत पांडवगड, केंजळगड, चंदन-वंदन गड येथे मोठया प्रमाणावर संवर्धनचे काम केले असून या बारवची स्वच्छता करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला
You must be logged in to post a comment.