ओम नमः शिवाय ..हर हर महादेव .. चा जयघोष

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा शहर परिसरातील विविध शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.सातारा शहरानजीकच्या संगम माहुली येथील काशीविश्वेश्वर मंदिर तसेच रामेश्वर मंदिरात भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती.

कृष्णा -वेण्णा नदीच्या संगमाच्या पलीकडे असणाऱ्या रामेश्वर मंदिरात यासाठी तराफा प्रकारात वाळूची पोती टाकून रस्ता तयार करण्यात आला होता भाविका हि मोठ्या उत्साहाने या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाऊन तेथे शिवपिंडीला दूध आणि पाण्याचा अभिषेक घालत होते.सातारा शहरातील कुरणेश्वर, कोटेश्वर, अमृतेश्वर, योगेश्वर, मुदगलेश्वर, बहुलेश्वर गणकेश्वर ,या शिवमंदिरात तसेच काशी विश्वेश्वर मंदिर आणि सातारा शहरा पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कास रस्त्यावरील यवतेश्वर मंदिरातही भाविकांनी अलोट गर्दी केली होती .

ओम नमः शिवाय ..हर हर महादेव ..च्या गर्जना देत भाविकांनी यथासांग पूजा करत दर्शनाचा लाभ घेतला .अनेक मंदिरातून महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे पदार्थ यांचे प्रसाद म्हणून वितरण करण्यात आले. गेली दोन वर्षे कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी प्रथमच भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले असल्यामुळे भाविकांच्या मध्ये एक विशेष उत्साह दिसून येत होता.

error: Content is protected !!