सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सैनिकांच गाव म्हणून ओळख असलेल्या मिलिटरी अपशिंगे या गावात रशियन बनावटीचा T-55 रणगाडा (Tank) दाखल झाला आहे. त्यामुळे या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील ‘मिलिटरी अपशिंगे’ गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातील वीर सुपुत्रांचं सैन्यदलातील योगदान लक्षात घेऊन या गावाला रणगाडा भेट देण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. जिल्हा सैनिक कल्याण केंद्राच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर गावकऱ्यांना यश आलं. मिलिटरी अपशिंगे गावाच्या सुपुत्रांच्या योगदानाचा आदर ठेऊन रशियन बनावटीचा T55 रणगाडा गावाला देण्यात आला. 2 मार्च रोजी विशेष लष्करी वाहनाने हा रणगाडा अपशिंगे गावात आणला गेला. या रणगाड्याच्या स्वागतासाठी गावातील आणि भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. T55 रणगाड्याची अपशिंगे गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. लोक उत्साहाने त्यात सामील झाले होते.
You must be logged in to post a comment.