शाहूपुरीत एकाचा दगडाने ठेचून खून

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील शाहूपुरीच्या दिव्यनगरी परिसरातील रस्त्यात अडवून एकाचा आज शुक्रवारी दि. 8 रोजी सकाळी खून केल्याची घटना घडली. संतोष विठ्ठल सूळ (वय 45) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, दिव्यनगरी येथील रस्त्यावर संशयितांनी लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आली. हल्ला करुन संशय़ित पसार झाले. या मारहाणीत सूळ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला. परंतू त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खून पैशांच्या देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

error: Content is protected !!