स्थानिक गुन्हे शाखेची रेकॉर्डब्रेक कारवाई; १६ गुन्हे उघड करत ४० लाखांचे सोने हस्तगत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): एक दरोडा, एक जबरी चोरीसह घरफोडीचे चौदा असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. दोघांनाही अटक करत त्यांच्याकडून ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत महेश उर्फ म्हावड्या मंगेश काळे, (रा. विसापुर, ता. खटाव) आणि ऋतुराज भावज्या शिंदे, (रा. खातगुण, ता. खटाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील घरफोडी, दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आल्या होत्या. या घटनांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दि. ३१ ऑगस्ट रोजी माहिती मिळाली, की पोलीस रेकॉर्ड वरील महेश उर्फ म्हावड्या मंगेश काळे याचा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात समावेश असून तो फलटण शहरात वावरत आहे. तो अत्यंत हुशार असून पोलिसांना सापडत नव्हता.त्याच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकाने फलटण येथील नाना पाटील चौकात सापळा लावला होता. त्यावेळी तो निदर्शनास आल्यानंतर पळून जाऊ लागल्याने त्याला पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा साथीदार ऋतुराज भावज्या शिंदे, (रा. खातगुण), कोहिनूर जाकीर काळे, (रा. मोळ), लक्ष्मण शिंदें, राजश्री शिंदे (दोघेही रा. विसापूर), अभय काळे, (रा. मोळ), अतिक्रमण काळे (रा. खातगुण) यांच्या सहकार्याने केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात महेश काळे याला अटक करून न्यायालयापुढे उभा केले असता न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली.ऋतुराज शिंदे यालाही अटक करून न्यायालयाकडे उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी. अटक केलेल्या दोघांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ७७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी हस्तगत करून उर्वरित गुन्ह्यातील ६६ तोळे सोन्याचे, चांदीचे दागिने असा एकूण ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक दरोडा, एक जबरी चोरीसह घरफोडीचे चौदा असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले असून नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ६७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, सनी आवटे, अमृत कर्पे, पंकज बेसके, हसन तडवी, राकेश खांडके, राजू कांबळे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, परशुराम वाघमारे, दलजित जगदाळे, दीपाली यादव, सौजन्या मोरे, शंकुतला सणस, आदिका वीर, अनुराधा सणस, मोनाली पवार, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी केली आहे.

error: Content is protected !!