
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीस राज्य शासनानाने मान्यता दिली आहे. त्यात पालिकेच्या विषय समिती सभापतिपदांची मुदत येत्या चार जानेवारी २०२१ रोजी संपत आहे. मुदत संपत असल्याने सभापतिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनधरणीस सुरवात केली आहे.
सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. तर विरोधात भाजप आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी आहे. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे दोघेही भाजपमध्ये असले तरी पालिका निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादीत होते. त्यामुळे तिरंगी लढत झाली होती. सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असून कास धऱण, सातारा मेडिकल काॅलेज आणि सातारा नगरपालिकेच्या हद्द वाढीसाठी महाविकास आघाडी सरकारने मदत केल्याची बोलले जात आहे. हद्द वाढीने नगरपािलकेचे कार्यक्षेत्र वाढले असून सध्याच्या सभापतींची मुदत संपत आहे.
४ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या नवीन सभापती निवडीसाठी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून लोकांमध्ये जावून काम करणारा आणि हद्दवाढीने नव्याने सामाविष्ट झालेल्या भागातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून खासदार उदयनराजे भोसले सभापतीची निवड करतील. त्यासाठी गटबांधणी सुरु केला आहे. मात्र, मागील सभापतींना तब्बल आठ महिने लाॅकडाऊनमुळे काम करण्याची संधी न मिळाल्याने पुन्हा मुदत वाढ देण्यात यावी, अशीही विदयमान सभापतींकडून मागणी होत आहे.
You must be logged in to post a comment.