वहागाव,(भूमिशिल्प वृत्तसेवा): हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड तालुका कराड येथील स्मृतिस्थळाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राजेंद्र मोहिते, शुभम चव्हाण, आदित्य गुरव, विघ्नेश चव्हाण, दत्तात्रय जाधव, राजेंद्र मोहिते, सचिन शहा, पुंडलिक बनसुर, हर्षद पाटील, हर्षद चव्हाण यांची उपस्थिती होती.
सरसेनापतींची तळबीड भूमी उदयनराजेंना भरघोस मते देऊन लीड देईल असा विश्वास राजेंद्र मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान चरेगाव येथील कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन मोहनराव माने यांच्या निवासस्थानी उदयनराजे यांनी भेट दिली. याप्रसंगी विक्रमबाबा पाटणकर, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख मनोज घोरपडे, भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ, संतोष कणसे यांची उपस्थिती होती.
You must be logged in to post a comment.