सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-लोणंद रस्त्यावर शिवथरनजीक सोमवारी सकाळी नऊ वाजता डंपरने मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून तीन महिला जखमी झाल्या आहेत.
वाठारच्या दिशेने साताऱ्याकडे निघालेल्या (MH42-AQ5015) दहा चाकी खडी घेऊन निघालेल्या डंपरने ट्रॅक्टर क्रमांक MH11CW7856 ला पाठीमागून जोरदार धडक दिली असून सदर ऊस तोडणीसाठी महिला कामगार घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या वंदना जालिंदर शेंडगे (वय 40 रा. बाभूळगाव जि. अहमदनगर) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर शालन आबासाहेब काजवे, नंदा राजू आडागळे, अंजली गायकवाड सर्व राहणार (सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) या जखमी झाल्या असून जखमींना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
You must be logged in to post a comment.